बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते जगदीश कोळेकर यांची भाज युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे आणि बारामतीचे तालुकाध्यक्ष प्रकाश जगताप यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
जगदीश कोळेकर हे गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत. दरम्यान या निवडीनंतर त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या शाखा तालुक्यात विविध गावात उघडणार असल्याचे व त्यातून युवकांचे संघटन करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान यावेळी भाजपचे बारामती शहराध्यक्ष सुजित वायसे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस वैभव सोईस्कर, माळेगावचे प्रमोद तावरे, अजिंक्य टेकवडे, साकेत जगताप, प्रमोद साबळे, ज्ञानेश्वर माने, संदीप केसकर, चंद्रकांत केंगार, नितीन शेळके, प्रमोद डिंबळे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.











