बारामती : महान्यूज लाईव्ह
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते, ते पुढे टिकले नाही, जर सरकार गेले नसते तर ते आम्ही टिकवले असते, पण 2018-19 मध्ये सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी तो कायदा केला. महाराष्ट्रामधील लोकांच्यात धूळफेक केली. राज्यात दोन समाजाला पेटवण्याचे काम केलं जात आहे, त्यांना जाब विचारला पाहिजे. अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज बारामतीत केली.
बारामतीत आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लोकशाही कुठं चालली हा गंभीर विषय आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे काय सुरू आहे? विधिमंडळामध्ये काय सुरू आहे? खरेतर हा गंभीर प्रश्न आहे. आपल्या राज्याचे सामाजिक स्वास्थ बिघडता कामा नये. प्रश्न कायदेशीर पध्दतीने सोडवला पाहिजे.
आरक्षणचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला जे आश्वासन दिले होते त्याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर शपथ घेऊन आश्वासन दिलं असेल तर त्यांनी वेळ दिला पाहिजे
दुसरीकडे राज्यातील नेतेमंडळी ज्या प्रकारची जाहीर वक्तव्य करत आहेत, ती व्हायला नको होती. यातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे
चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, चार राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येईल. आमची भीती ही आहे की, जर अंतर जास्त नसेल तर आम्हाला ऑपरेशन लोटसला सामोरे जावे लागेल.











