पुणे : महान्यूज लाईव्ह
राज्यात पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेकडे कार्यरत असलेल्या अर्धवेळ स्त्री परिचर, आशा वर्कर व गटप्रवर्तकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मंजूर केला. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून 36 लाख रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे.
या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील अर्धवेळ स्त्री परिसर असलेल्या 544 महिलांना तसेच आशा वर्कर व गटप्रवर्तक असलेल्या 3000 महिलांना याचा लाभ मिळणार असून त्यांची दिवाळी या निमित्ताने गोड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोणत्याही जिल्हा परिषदेने अशा प्रकारचे अनुदान दिले नव्हते, परंतु पुणे जिल्हा परिषदेने हे अनुदान देऊन या आशा वर्कर, गटप्रवर्तक व अर्धवेळ स्त्री परिचरांची दिवाळी गोड केली आहे. पुणे जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.











