विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : अंकिता पाटील ठाकरे यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बारामती मधील भाजप कार्यालयाला भेट दिली, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे. खरंतर माझा जन्म बारामतीचा आहे. बारामती मधूनच आम्ही पक्ष बांधणीची सुरुवात करतोय असं त्या म्हणाल्या.
बारामतीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी गाव तेथे शाखा आम्ही सुरू करणार आहोत आणि जास्तीत जास्त बांधणी युवा मोर्चाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या,भारतीय जनता पार्टीने मला युवा मोर्चा अध्यक्षपद दिले, त्यामुळे निश्चितच पक्ष जो आम्हा सर्वांना आदेश देईल, पक्ष जो उमेदवार जाहीर करेल, त्यांचा प्रचार आम्ही करू, त्या त्यासाठीची जी पूर्वबांधणी आहे. ती पूर्वबांधणी किंवा ग्राउंड लेव्हलचे काम आम्ही येथून पुढच्या काळात सगळेजण एकत्रित पद्धतीने करणार आहोत. तसेच युवा मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा, ग्राउंड लेव्हलचे युवकांचे, महिलांचे जे प्रश्न आहेत, ते आम्ही मांडणार आहोत.
खरंतर सरकार आपलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न आम्ही मांडू. युवकांची बांधणी मोठ्या प्रमाणात कशी करू शकतो. सगळ्यात मोठा प्रश्न युवकांचा आपल्या राज्यामध्ये असेल तर तो बेरोजगारीचा आहे. याबाबतीत आम्ही सगळेजण खूप गंभीर आहोत आणि याबाबतीत निश्चितपणे आम्ही इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त जॉब युवकांना मिळावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंकिता पाटील ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.