राजु झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अनेक गावांतील माजी आमदार रमेश थोरात यांचे समर्थक भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याने आमदार कुल यांना मोठे राजकीय बळ मिळत आहे. तालुक्यातील जिरेगाव येथील सरपंच शभरत खोमणे व उपसरपंच सुनंदा भंडलकर यांच्यासह दोनशे कार्यकर्तेंचा भाजप मध्ये नुकताच प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना तालुक्यात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात राजकीय उड्या मारत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. कधी आमदार राहुल कुल यांच्यावर नाराजी व्यक्त करत, कधी माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर नाराजी व्यक्त करत या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करताना कार्यकर्ते दिसत आहेत.
आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी जिरेगाव येथील सरपंच भरत खोमणे व उपसरपंच सुनंदा भंडलकर यांच्यासह बाळकृष्ण लाळगे, बापूराव लोणकर, कृष्णा भंडलकर, युवराज खोमणे, त्रिंबक भंडलकर, रमेश भंडलकर, महेंद्र खंडाळे आदींसह सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी आमदार कुल यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन कुल यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले