राजु झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती व रावणगाव येथील उत्तम आटोळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवर अनेक पदावर संधी घेण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, दौंड शुगरचे संचालक विविध जगदाळे, कात्रज दूध संघाच्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी थोरात समर्थकांनीही अजित पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौंड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच विविध पदांवर निवड करण्यात आली. दौंड तालुका अध्यक्षपदी उत्तम आटोळे तसेच जिल्हा कार्यकारणीवर विजय नागवडे,रामचंद्र चौधरी, बाळासाहेब निवगुणे, जिल्हा उपाध्यक्ष पदी संभाजी ताकवणे, रंगनाथ फुलारी, ज्ञानेश्वर चव्हाण, तात्यासाहेब ताम्हाणे,
जिल्हा सरचिटणीस पदावर विलास बोरावणे, भाऊसाहेब ढमढेरे , प्रवीण लोंढे, जिल्हा चिटणीस पदी शिवाजी ढमाले,संताजी शेळके,मनोज शेळके, अमित गिरमकर, अरुण थोरात तसेच दौंड शहराध्यक्ष पदी गुरुमुख नारंग यांना संधी देण्यात आली आहे.