दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडुन चोरी करणाऱ्यांसाठी स्फोटकांचा वापर करणाऱ्या अट्टल टोळीला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. विशाल छबु पल्हारे ( वय २०,रा. हंगेवाडी ,ता श्रीगोंदा जि नगर ), आदित्य प्रदीप रोकडे ( वय २०,रा.चिंचणी ता शिरूर जि पुणे), अनिकेत संजय शिंदे वय २०, रा. बोरी ता श्रीगोंदा जि नगर), आदित्य खोमणे (रा. मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे) अशी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथील एटीएम मशीन तीन वेळा स्फोटक पदार्थाच्या सहाय्याने उडवून देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडे सोपवला.
गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने या टोळीला पकडण्यात यश मिळवले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, फौजदार गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पांधारे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, जनार्दन शेळके, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.











