सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलींद साबळे यांच्या नेतृत्वाखाली काल इंदापूरात ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ आणि ‘ जुमला दिवस ‘ केक कापून व चॉकलेट वाटून साजरा करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी ऐहसन खान , युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयसिंह चौधरी, पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांच्या आदेशाने इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगारी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मिलींद साबळे म्हणाले, प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर हा राष्ट्रीय बेरोजगार दिन सुरू करण्यात आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी तरुणांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. पण नोटाबंदी आणि कोरोना काळात कोट्यवधी तरुणांचा आहे तोच रोजगार हिरावून घेतला गेला आहे. शिवाय केंद्र सरकारकडून सरकारी कंपनी खाजगी हातात सोपवली जात आहे. त्यानंतर आता फक्त कंत्राटी नोकरी उरणार आहे.
याचा निषेध म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी सुफियान खान जमादार, नईम शेख, ॲड. नितीन सोनवले, गोविंद काटदौंड, संदीप भोसले, रोहित पवार, अनिकेत जाधव यांच्यासह इंदापूर युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.











