बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील BBA(CA) विभाग व
i-brain डिजिटल सॉफ्टवेअर ( USA based) कंपनीमध्ये सामंजस्य करार संपन्न झाला.
या करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे आणि व i-brain डिजिटल सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक कौशल चुंबळकर यांनी स्वाक्षरी केली.
दोन्ही संस्था ज्ञान-वाटप आणि परस्पर वाढीच्या या प्रवासाला सुरुवात करत असताना, भविष्यात शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करण्याचे प्रयत्न करणार आहेत.
हे सहकार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि डिजिटल युगातील आव्हाने आणि संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या विविध उपक्रमावर विशेष आहे. हा सामंज्यस्य करार पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उपप्राचार्य शामराव घाडगे, उपप्राचार्य लालासाहेब काशीद, बी. बी. ए. (सी.ए.) विभागप्रमुख महेश पवार, संगणकशास्त्र विभागप्रमुख गजानन जोशी, IQAC समन्वयक नीलिमा पेंढारकर यांचे सहकार्य लाभले.
हा करार यशस्वी होण्यासाठी सलमा शेख, गौतम कुदळे, विशाल शिंदे, अनिल काळोखे, अक्षय भोसले, पुनम गुंजवटे, वैशाली पेंढारकर, अक्षय शिंदे, कांचन खीरे यांनी विशेष परिश्रम घेतले.











