इंदापूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता (गट अ) राजपत्रित अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत किर्ती कस्तुरे-गाढवे यांनी ओबीसी महिला प्रवर्गात राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या पदासाठी ११ सप्टेंबर २०२२ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्यांना १३२ गुण मिळाले.
किर्ती कस्तुरे- गाढवे इंदापूर येथे मागील एक वर्षापासून इंदापूर येथे विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांची वकिलीची सुरुवात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून झाली. मागील १५ वर्षापासून बारामती येथे वकिली करत आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण कोरेगाव येथे झाले, कायद्याची पदवी सातारा येथून घेतली. पती नोकरी करतात. किर्ती कस्तुरे यांचे वडील सहकारी बँकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. तर आई एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून पर्यवेक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.
किर्ती कस्तुरे गाढवे यांना ब्लॉग लेखन, प्रवास वर्णन, चित्रपट परीक्षण, कविता लेखन इत्यादी छंद आहेत तसेच त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.