जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : पुणे – सातारा जिल्ह्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्गावरील सुसाईड पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारोळा येथील नीरा नदी पुलावरून निलेश महादेव काकडे (वय -४० वर्ष रा.पुणे) यांनी मारण्याचा संशय होता याद्वारे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही माहिती दिली जात होती मात्र त्यांचा तपास लागत नव्हता त्यांची दुचाकी या ठिकाणी होती मात्र आता 75 तासानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस तसेच जल आपत्ती पथकाने शोध मोहीम सुरू केली होती अखेर ७५ तासाच्या अथक परिश्रमातून शुक्रवारी (दि.११ रोजी) निलेश यांचा मृतदेह राजापूर गावच्या हद्दीत निरा नदीत मिळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा येथील पुलावर निरा नदीपात्रात उडी मारून जीव दिल्याचा संशय पुलावर मिळून आलेल्या ॲक्टिव्हा गाडीमुळे व्यक्त करण्यात आला होता. निलेश काकडे हे कंपनीत जातो असे सांगून (दि.८) घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांना संपर्क करण्यात आला. संपर्क तर झाला नाही परंतु याच दिवशी रात्री निलेश यांच्या वापरात असलेली स्कूटी गाडी (एम एच ५० व्ही १३४७) नीरा नदी पुलावर मध्यभागी आढळून आली.
त्यामुळे नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याचा व नीरा नदीवरून त्यांनी उडी मारल्याचा संशय व्यक्त करणारा खबरी जबाब राजगड पोलीस स्टेशन मध्ये दिला होता. त्यानुसार (दि १० पासून) राजगड पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या माध्यमातून शोध कार्य सुरू करण्यात आले होते. काल रात्री अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यानुसार नीरा नदी पात्रात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राजापूर गावच्या हद्दीत मृतदेह आढळून आला. या शोध मोहिमेसाठी राजगड पोलीस, महाबळेश्वर ट्रॅकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीम यांनी अथक परिश्रम घेतले.