शिरूर : महान्यूज लाईव्ह
सामाजिक बांधिलकी जोपासत व्यापाराबरोबर पत्रकारीतेची असलेली आवड जोपासत कुटुंबांतील मुलाना शिक्षण देत शिक्रापूरात सराफी व्यवसायात असलेल्या शहाणे परिवारातील भाग्यश्री शहाणे ही पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाली.
भाग्यश्रीचे वडील नंदकुमार शहाणे हे सोन्या-चांदीच्या व्यवसायासह गेली २५ वर्षं पत्रकारीतेत काम करत आहे. आयुष्यातील चढ उतार बघत मुलीच्या या यशाने संपूर्ण शहाणे परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
भाग्यश्री शहाणे यांचे मूळ गाव निर्वी येथील. मात्र काही वर्षांपूर्वी हे सर्व शिक्रापूरात व्यवसायासाठी आले व उत्तम व्यवसायासोबत सामाजिक कार्यातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान भाग्यश्री हीचे वडील नंदकुमार शहाणे यांनी शिक्रापूर परिसरात काही काळ पत्रकारीताही केली आणि सामाजिक क्षेत्रात शासकीय योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन यशस्वीही पार पाडल्या.
यासोबतच आपली मुलगी उच्चस्तरीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावी हे स्वप्न नंदकुमार शहाणे यांचे असल्याने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाग्यश्री हीने स्वत:हून बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये बी.एस.सी (अॅग्री) करीत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तिच्या पहिल्याच प्रयत्नात तीने फौजदार होण्याचे वडीलांचे स्वप्न पूर्ण तर केले.
भाग्यश्रीच्या यशाबद्दल शिक्रापूर व्यापारी असोसिएशन, शिरुर तालुका ज्वेलर्स असोसिएशन व पत्रकार संघटने कडून तिचे अभिनंदन केले. शिरुर तालुक्यातील सर्व व्यापा-यांच्या उपस्थितीत तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. वडील नंदकुमार व चुलते जितेंद्र हे सराफी व्यवसायात तर आई पुष्पाताई या सध्या गृहीणी.
लहान बहीण धनश्री फॅशन डिजाईन करतेय तर भाऊ अभिजित हा सिमेंट कंपनीत तालुका इन्चार्ज म्हणुन काम पाहत तर लहान भाऊ नकुल हा पुणे येथे एल एल बी चे शिक्षण घेत आहे. पर्यायाने शहाणे परिवारातील भाग्यश्री ही पहिली प्रशासकीय अधिकारी ठरली असल्याची माहिती चुलते जितेंद्र शहाणे यांनी दिली आहे.