नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
बातमी आहे उत्तर प्रदेशातील! वाराणसीच्या लंका या गावात अजय फौजी नावाच्या विक्रेत्याने टोमॅटोची भाववाढ लक्षात घेत विडंबन करत टोमॅटोची राखण करायला चक्क दोन बाऊन्सर ठेवले आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा खास फोटो ट्विट करत भाजपने टोमॅटोला झेड प्लस सुरक्षा आता द्यावी असा टोला लगावला आहे. टोमॅटोच्या भाववाढीमुळे देशात चर्चा असली, तरी टोमॅटोची भाव वाढ झाली म्हणून ओरड करणाऱ्यांना शेतकरी फटकार लगावत आहेत. अशातच अखिलेश यादव यांनी हा फोटो ट्विट करत संपूर्ण देशात राजकीय चर्चा घडवून आणली आहे.
टोमॅटोचे उत्तरेकडील व एकूणच देशातील उत्पादन घटल्याने टोमॅटोची भाव वाढ झाली आहे. टोमॅटो अगदी शंभर ते सव्वाशे रुपये किलो पर्यंत पोहोचले असल्याने गेल्या काही वर्षातील टोमॅटोचीही सर्वाधिक भाव वाढ मानली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मॅकडोनाल्ड च्या बर्गर मधून टोमॅटो गायब झाल्याची बातमी झाली होती. शेतकरी असं म्हणतात की, भाव वाढ झाली म्हणून एवढी आरडाओरड करता, ज्यावेळी टोमॅटो फेकून द्यावे लागतात त्यावेळी गप्प का बसता?