इंदापूर न्यायालयात ॲड.आव्हाड यांचे व्याख्यान संपन्न..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भारतासारख्या खंडप्राय देशाला एकसंध ठेवणे व त्याचा कार्रभार बघणे हे फक्त आणि फक्त भारतीय राज्य घटनेमुळेच शक्य झाले आहे, असे प्रतिपादन सुप्रीम कोर्टातील विधीतज्ञ ॲड. अरविंद सुधाकर आव्हाड यांनी केले.
इंदापूर न्यायालयात आव्हाड यांचे “सुप्रीम कोर्टचे महत्त्वाचे न्यायनिवाडे व भारतीय राज्यघटना” ह्या वर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अरविंद आव्हाड हे सुप्रीम कोर्टात गेल्या १५ वर्ष विधी सेवा करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासन व अनेक महत्त्वाच्या खटल्यात प्रतिनिधित्व केलेले आहे.
या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष नरेंद्र शहा, ॲड. आशुतोष भोसले, ॲड एन. जी. शहा, ॲड. शशिकांत साबळे, ॲड. समीर टिळेकर, ॲड.धनंजय विंचू, ॲड.बाळासाहेब चव्हाण, ॲड. विकास देवकर, ॲड. भारत जगताप, श्रीकांत करे, आनंद केकाण, अवधूत डोंगरे, बापूसाहेब साबळे, आसिफ बागवान, अजिंक्य धारूरकर, अनिल पारेकर, विशाल राऊत, संकेत नगरे, संतोष खाडे, राम इजगडे, ॲड. वैजनाथ गायकवाड , ॲड.कमलाकांत तोरणे, ॲड. दशरथ मगर आदी उपस्थित होते.











