दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
मुंबईच्या राज्यभर शाखांचे जाळे पसरलेल्या ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावचे सुपुत्र व मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे संचालक जिजाबा पवार व संचालक पदी शुभम जिजाबा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वेळे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाई तालुक्यातील वेळे हे गाव जरी लोकसंख्येच्या मानाने छोटे असले, तरी तालुक्याच्या राजकीय पटलावर म्हत्वाची भुमीका बजावत असते. येथील मान्यवरांनी राजकीय सामाजिक शैक्षणीक सहकार अशा अनेक क्षेत्रातील मोठ मोठ्या पदांवर निष्कलंक यशस्वी कामगीरी करुन दाखवली आहे.
गावच्या आणि तालुक्याच्या विकास कामांना साथ देणारे गाव म्हणून वेळे गावची वेगळी ओळख आहे .याच गावचे जिजाबा पवार एक आहेत. त्यांनी मुंबईत राहुन आपली राजकीय सामाजिक शैक्षणीक सहकार क्षेत्रात उल्लेखनीय निस्वार्थ भावनेने आजपर्यंत केलेल्या कामाची ज्ञानदीप बॅंक परिवाराने घेतल्यानेच त्याची पोहच पावती म्हणून त्यांना ज्ञानदीप बॅंकेच्या चेअरमनपदी बसविल्याने वेळे ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी तरुण मंडळे आणि ग्रामस्थांनी बॅंकेच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देवून त्यांचे आभार मानले आहेत .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, सरपंच रफिक इनामदार, ॲड.उमेश पवार, वाई बाजार समिती संचालक श्री. अशोक सोनवणे, सोसायटीचे चेअरमन शिवाजी पवार, माजी उपसरपंच संतोष नलावडे, माजी सरपंच मधुकर पवार, माजी चेअरमन बाळकृष्ण पवार, ज्योत्स्ना गायकवाड, नंदलाल पवार, मधुकर पवार, मोहन गाढवे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.