शिरूर : महान्यूज लाईव्ह
काल परवा एका पाच महिन्यांच्या घोडीने अहमदनगर ते शिरूरच्या ढोकसांगवीपर्यंतचा प्रवास चक्क फॉर्च्युनर गाडीतून केला. बैलगाडीच्या शर्यतीतून बैलांना त्रास होतो, शेतकरी त्यांच्या पाळीव जनावरांना त्रास देतात असे म्हणणाऱ्या पेटाला किंवा पेटासारख्या संस्थांना सणसणीत चपराक आपल्या कृतीतून एका शेतकऱ्याने दिली. या शेतकऱ्याचे गाव आहे शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी!
ढोकसांगवी येथील शेतकऱ्याने पाच महिन्याची घोडी 25 हजारात विकत घेतली. अहमदनगर येथे बाजारात खरेदी केलेली ही घोडी आणण्यासाठी स्वतंत्र टेम्पो किंवा इतर वाहतुकीची व्यवस्था करावी हे पाचंगे यांना जमले असते, पण त्यांनी ही घोडी चक्क त्यांच्या फॉर्च्युनर गाडीतून आणली.
या घोडीला फॉर्च्यूनर गाडीतून उतरवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्याचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे शेतकरी आपल्या जनावरांना किती महत्त्व देतो, अंत:करणापासून जपतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.