दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई शहर हे विविध कला गुणांचे केंद्र म्हणून संपूर्ण राज्यात त्याचा नावलौकिक आहे. येथील सोनगीरवाडीचे
दिलीप गुळुंबकर या नामवंत चित्रकाराने जिल्ह्याचा कलारत्न पुरस्कार पटकावला हे त्यांच्या कतृत्वाची पावती आहे. अशा कलाकाराचा माझ्या हस्ते सत्कार होतोय ही माझ्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे असे गौरव उदगार राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
यावेळी सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, पक्ष निरिक्षक श्रीरंग सातारा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.अल्पना यादव .वाई तालुक्यातील उद्योजक प्रताप यादव यांच्यासह
कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
वाई शहरातील सोनगीरवाडी येथील रहिवासी असलेले दिलीप गुळुंबकर हे चित्रकलेचे अभ्यासक म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत. आपल्या कलेशी एक निष्ठ राहुन ते आपला छंद जोपासत असतानाच त्यांच्या या कलेची दखल सातारा जिल्हा चित्रकार व कलाकार या नामवंत संघटनेने घेऊन त्यांना कलारत्न पुरस्कार देवून दिलीप गुळुंबकर यांना गौरवण्यात आले.
दिलीप गुळुंबकर हे वाई शहरासह सातारा जिल्ह्यात उत्कृष्ठ चित्रकार म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत. कुठलेही कसलेही चित्र ते सहजपणे काढतात.