पुणे – महान्यूज लाईव्ह
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (ssc) घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल उद्या म्हणजे २५ मे रोजी होणार आहे.
दुपारी दोन वाजता हा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खालील संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. mahresult.nic.in, https://hsc.mahresults.org.in,
http://hscresult.mkcl.org या तीन संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल.
कालच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ७० हून अधिक परिक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर उद्या आता बारावीतील यशवंतांची माहिती समजणार आहे.
यावर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या या परिक्षेचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होईल. या परीक्षेसाठी राज्यातील १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांतील १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले होते.