नांदेड – महान्यूज लाईव्ह
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया.. हे भक्तीगीताचे वाक्य कानावर पडले की, मारुतीराया आपल्या डोळ्यासमोर येतोच.. बालपणी सूर्याला गिळण्याएवढे तेज असलेल्या मारुतीरायाच्या पूजक असलेल्या पालकांनी आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्याच्या गळ्यात मारुतीरायाची तीन सेंटीमीटरची मुर्ती बांधली होती.. त्या चिमुकल्याने ती मुर्तीच गिळली..आणि पालकांचे धाबे दणाणले.
हिंगोलीतील चार वर्षीय मयूर वहावळ या चिमुकल्याच्या बाबतीत हा प्रकार घडला. मयूरने सहज गळ्यातील गोफ तोंडात धरला आणि मुर्ती गिळली.. मुर्ती अन्ननलिकेत अडकली. आणि मयूरला श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला.
पालका्ंनी त्याला त्वरीत प्राथमिक रुग्णालयात नेले, मात्र उपचारासाठी त्याला मोठ्या दवाखान्यात घेऊन जावे लागेल असे दिसताच नांदेडमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथे डॉ. नितीन जोशी यांनी एन्डोस्कोपी करून कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता डॉक्टरानी ही मुर्ती बाहेर काढली.