सराफवाडी ग्रामस्थांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे श्रीराम मंदिरासमोर सभा मंडपासाठी ३० लाखांची मागणी केली.. भरणेंची तात्काळ ३५ लाख रुपये मंजूर केले..! रामजन्मोत्सव यात्रा कमिटी ने मानले भरणेंचे आभार..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : श्रीराम जन्मोत्सव यात्रेनिमित्त आमदार दत्तात्रय भरणे यांनी सराफवाडी यात्रेला भेट दिली. यात्रा कमिटीच्या वतीने आमदार भरणे यांना यात्रा कमिटीच्या वतीने श्रीराम मंदिर प्रांगणात सभामंडप बांधण्यासाठी ३० लाख रुपये मंजूर करावेत अशी मागणी केली. आणि आमदार भरणे यांनी सभा मंडपासाठी ३५ लाख रुपये मंजूर करत असल्याची घोषणा केली.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी सराफवाडी ला श्रीराम मंदिराला भेट दिली. यावेळी भरणे व शिवाजी जाधव यांनी श्रीं ची आरती केली. आरती झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने भरणेंचा सत्कार सरपंच निलेश जाधव यांनी केला. यावेळी सरपंच निलेश जाधव व यात्रा कमिटीचे अध्यक्ष महम्मद शेख यांनी श्रीराम मंदिर प्रांगणात सभामंडप बांधण्यासाठी 30 लाख रुपयांची मागणी केली.
यावेळी भरणेंनी ग्रामस्थांना रमजान व रामनवमीच्या शुभेच्छा देत मागणी केलेल्या सभामंडपासाठी 35 लाख रुपये निधी ची घोषणा केली. सराफवाडी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांनी आमदार भरणे यांचे आभार मानले.