सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर व त्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणारे अभिजित गोरे देशमुख यांची पुणे जिल्हा व शहर एन एस यू आय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी नागेश करीअप्पा यांनी ही नियुक्ती केली आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नागेश करीअप्पा यांच्या हस्ते अभिजित गोरे देशमुख यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले.. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विजयसिंह चौधरी उपस्थित होते.
अभिजित गोरे देशमुख हे इंदापूर तालुका कॉंग्रेसच्या एन एस यू आय संघटनेचे अध्यक्ष व एन एस यू आयचे प्रदेश सचिव असून नंदूरबार जिल्हा एनएसयूआय प्रभारी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवर आवाज उठवला आहे. त्यांच्या समस्यांवर विविध आंदोलन करुन विद्यार्थी संघटनेचे हित जपले आहे. कोरोना काळात नागरिकांना अनेक प्रकारचे मदतसाह्य केले आहे.