सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – समाजकार्यात अग्रेसर भूमिका बजावणाऱ्या इंदापूर शहरातील टिपू सुलतान यंग सर्कल या सामाजिक संस्थेच्या वतीने इंदापूर मध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीस मुस्लिम बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना शुक्रवार (दिनांक २४) पासून सुरू झाला. रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी टिपू सुलतान यंग सर्कल यांच्या वतीने शहरातील सर्व मज्जिद व सर्व मुस्लिम समाजाला रोजा इफ्तार पार्टीचे मोठे प्रमाणात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. टिपू सुलतान सर्कल चे सर्व कार्यकर्ते हे सतत सामाजिक कामात अग्रेसर असतात. सन 2016 साली टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त रुग्णवाहिका अर्पण इंदापूर शहरासाठी करण्यात आली होती. समाजासाठी अष्टोप्रहर झटणारी संस्था म्हणून टिपू सुलतान यंग सर्कल कडे पाहिले जाते.