बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीबीए (सी ए ) या विभागामार्फत २९ मार्च २०२३ रोजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन व वैशिष्ठ्यपूर्ण अशी विद्याटेक स्पर्धा होणार आहे.
याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली. राज्यस्तरीय होणाऱ्या या स्पर्धेमध्ये फक्त बी. बी. ए.(सी.ए.) तसेच बी. सी. ए. (कॉमर्स) प्रथम, द्वितीय, व तृतीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यामध्ये एकूण पाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१) प्रोग्रामिंग वॉर: या स्पर्धेत सी प्रोग्रामिंग लॅग्वेजच्या आधारे विविध प्रोग्रॅम स्पर्धकाला तयार करावयाचे आहेत. स्पर्धेसाठी वैयक्तिक सहभाग असेल. संपर्क- अक्षय भोसले-८३७९८३२९७१
२) प्रोजेक्ट कॉम्पिटिशन: या स्पर्धेसाठी कोणतेही प्रोग्रॅम लॅग्वेजमधील स्वतः तयार केलेले प्रोजेक्ट सादर करावयाचे आहे. स्पर्धेसाठी सहभाग हा एक किंवा दोन विद्यार्थ्याचा गट करता येईल. संपर्क-अनिल काळोखे-७७०९७३३०४४
३) पेपर प्रेझेंटेशन: या स्पर्धेसाठी रेसेन्ट ट्रेंड्स अँड टेक्नॉलॉजी या विषयावर आधारित शोधनिबंध सादर करावयाचा आहे. स्पर्धेसाठी सहभाग हा एक किंवा दोन विद्यार्थ्याचा गट करता येईल. संपर्क – विशाल शिंदे -७०८३९४७४४३
४) पोस्टर प्रेझेंटेशन : या स्पर्धेसाठी रिसेन्ट ट्रेंड्स / टेक्नॉलॉजी या विषयावर आधारित पोस्टर सादर करावयाचे आहे. स्पर्धेसाठी सहभाग हा एक किंवा दोनच्या गटात करता येईल. संपर्क-अक्षय शिंदे -९५२७५७२३३
५) प्रश्नमंजुषा स्पर्धा : या स्पर्धेत अद्यावत माहिती आणि तंत्रज्ञान आधारित काही फेऱ्यामध्ये सहभागी व्हावे लागेल. स्पर्धेसाठी वैयक्तिक सहभाग असेल. संपर्क- सलमा शेख – ९२७२५४२३८८ वैशाली पेंढारकर ९९७५९५५९७७
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून त्यांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती महेश पवार यांनी दिली.