बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या नावलौकिकाला साजेशी बिनविरोध निवड करून बारामतीच्या वकील संघटनेने सन २०२३-२४ च्या कार्यकारिणीची निवड केली. बारामतीतील ज्येष्ठ वकील उमेश काळे यांची अध्यक्षपदी तर अॅड. काकासाहेब आटोळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बारामती वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची मुदत ही सन २०२३-२४ या कालावधीतील असून उपाध्यक्षपदासाठी दोन वकीलांची निवड करण्यात आली. यामध्ये ॲड. काकासाहेब आटोळे व ॲड. योगेश गाडेकर या दोघांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दरम्यान संघटनेच्या सचिवपदी ॲड.प्रिया काटे-देशमुख, सहसचिवपदी ॲड.किशोर मोरे, खजिनदारपदी ॲड. राजेंद्र मासाळ, ग्रंथपालपदी ॲड. शिवाजी भोई व महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. कोमल शिपकुले यांची निवड करण्यात आली.
या निवडणूकीसाठी अगोदर असलेल्या इच्छुकांनी आपापले अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल संघटनेने याही सर्व उमेदवारांचे आभार मानले.