लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत इंदापूर शहरातील 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी… गारटकर यांचा दावा
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर शहराच्या विकासासाठी १५ कोटी ४६ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत इंदापूर शहरासाठी 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. इंदापूर शहरातील लोकांच्या मागणीचा विचार करून आमदार दत्तात्रय भरणे व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सर्व वार्डनिहाय स्वतः जाऊन प्रत्येक कामांची मागणी प्रमाणे पाहणी करूनच या कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यानुसारच जिल्हा नियोजन समिती मध्ये खालील कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्रदीप गारटकर यांनी दिली…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत इंदापूर शहरातील 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून जिल्हा नियोजन समिती २०२३-२४ दलीतवस्ती योजनेअंतर्गत इंदापूर शहरातील विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.
यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये समाज मंदीराचा दुसरा मजला बांधकाम करणे- निधी 91,34,800 रुपये, अविनाश मखरे घर ते गायकवाड घर ते पुणे-सोलापूर हायवे रस्ता व बंदिस्त ड्रेनेज ओड्यापर्यंत करणे- निधी 41,31,585, प्रभाग क्र. १ डॉ. आंबेडकर वसाहत विलास मखरे घर ते रामचंद्र मखरे घर पाचवे करणे – निधी 11,83,796 रुपये,
डॉ.आंबेडकरनगर व साठेनगर मधील स्मशानभूमी सुशोभिकरण करणे 47,69,242 रुपये, ज्योतिबा माळ स्मशानभूमी ते हनुमंत कांबळे घर ते विलास मखरे घर ते शिवाजी मखरे घरापर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज करणे- निधी 1,07,79,478 रुपये अशा विकासकामांचा समावेश आहे.
महाराष्ट्र नागरोत्थान महाअभियान योजना २०२३-२४ अंतर्गत ९ कोटी ५ लाख ९९ हजार रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये इंदापूर नगरपरिषदेमध्ये योगभवन व लँडस्कॅपिंगचे काम (बांधकाम भाग- अ) करणे – निधी १,५२,८८०५६रुपये,
इंदापूर नगरपरिषदेमध्ये योगभवन व लँडस्कॅपिंगचे काम (बांधकाम भाग-ब) करणे.- निधी ८०,३६,१११ रुपये,
नगरोत्थान योजनेंतर्गत इंदापूर शहरात विविध ठिकाणी हायमास्ट उभा करणे.- निधी २०,९१,६४६ रुपये,
नॅशनल हायवे बुलेट शोरूम ते डॉ. रूपनवर यांच्या हॉस्पिटलपर्यंत रस्ता व अंडरग्राउंड ड्रेनेज करणे.- निधी ३४,५५,३१४ रुपये,मंडईमध्ये अंतर्गत रस्ते करणे.- निधी ६८,७३,८९४ रुपये, रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईन व रस्ते करणे.- निधी ४५,३६,१०० रुपये,
प्रभाग क्र. १ मध्ये भैरोबा नगर येथे अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे.-निधी १,२८,२१०८० रुपये, इंदापूर तहसिल कार्यालय ते इजगुडे पेट्रोल पंपापर्यंत रस्ता करणे- निधी १,६३,५४२०५ रुपये, दत्तनगर अंतर्गत ते कदम सभागृह ते बोरा हाईटस ९. ते वडारगल्ली शौचालयापर्यंत अंदर ग्राउंड ड्रेनेज करणे.- निधी १,१२,१३०३६ रुपये, महात्मा फुले शॉपिंग सेंटर नॅशनल हायवे ते मंगेशपाटील हॉस्पिटल पर्यंत 100 फुटी रस्ता करणे १,९९,९५६७४ रुपये,अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.
गारटकर म्हणाले, महाराष्ट्र नागरोत्थान महाअभियान योजना २०२२-२३ अंतर्गत इंदापूर शहरातील ३ कोटी ४१ लाख रुपयांच्या विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये जगदाळे घर ते निंबाळकर घर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 3 लाख 92603 रुपये, राजेवलीनगर येथील अंतर्गत रस्ते करणे.- 36,37276 रुपये, दादा देवकर घर ते मेनरोड पर्यंत रस्ता व अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे.- 3,01,359रुपये, गदादे घर ते मेनरोड गटर पर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे.- 4,34,045रुपये.
कदम सभागृह ते गणेश मंदिरापर्यंत रस्ता करणे- 13,20,715 रुपये, गणेशनगरमध्ये निलकंठ शिंदे घर ते नॅशनल हायवेपर्यंत रस्ता व अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे- 509937रुपये, गणेशनगरमध्ये पठाण घर ते नॅशनल हायवेपर्यंत रस्ता करणे- 329255 रुपये, गणेशनगरमध्ये शिवाजी तळेकर घर ते मेजर सुर्यवंशी घर ते बजरंग राऊत घरापर्यंत रस्ता करणे-रुपये 346609, गणेशनगरमध्ये डांगे घर ते नॅशनल हायवे पर्यंत रस्ता करणे- 368194 रुपये, श्रीराम सोसायटीमध्ये अंतर्गत रस्ते करणे-रुपये 903801,प्रभाग क्र. ३ मध्ये मराठी शाळा नं.१ नवीन स्टेज तयार करणे- रुपये 319137, प्रभाग क्र३. मध्ये नॅशनल हायवे ते अल्फा बाईट पर्यंत पेव्हर ब्लॉक फुटपाथ चौक सुशोभिकरण करणे-रुपये 342341,
सरस्वती नगरमधील प्रभाग क्र. ८ मध्ये जि.प. प्राथमिक शाळेसमोर सुशोभिकरण व वर्ग खोली करणे-रुपये 596927, सोनाईनगर मधील गणेशमंदिर समोर पेव्हर ब्लॉक करणे- 337802 रुपये. या कामांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.