शिरुर : महान्युज लाईव्ह
शिरूर शहरातील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील कोमल शितोळे या विद्यार्थिनीची आखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोमेश्वरनगर ( ता. बारामती ) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून तीची निवड आखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली आहे.
या विद्यार्थिनीने यापूर्वी विंझर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ५७ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक वैष्णवी शेळके हीचा तर ५५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक प्रतिक्षा चव्हाण हीचा आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा नसरापूर व विंझर येथे झाल्या. या स्पर्धेत आदित्य जाधव या विद्यार्थ्याचा कुस्तीमध्ये दुसरा क्रमांक आला असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच बरोबर रहाटनी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन शूटिंग स्पर्धेत ऋतुजा ठुबे हीचा द्वितीय क्रमांक आला असून तीची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर क्रॉसक्रंटी स्पर्धेसाठी अनिकेत साठे याची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्याना प्रा.डॉ.पी.एस.वीरकर, प्रा .नारायण काळे व अनिल पांढरमिसे यांनी मार्गदर्शन केले असून या विद्यार्थ्यांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा ,सचिव नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ .के .सी मोहिते यांनी अभिनंदन केले आहे.











