• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवस्मारकाची पाच वर्षे ! फक्त राजकारणासाठीच केला महाराजांचा वापर ?

tdadmin by tdadmin
December 24, 2021
in संपादकीय, सामाजिक, मुंबई, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

महान्यूज लाईव्ह टीम

काल २३ डिसेंबर ही तारीख होती. बरोबर पाच वर्षापूर्वी २३ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईजवळच्या समुद्रात एक मोठा सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी एक समुद्रामध्ये एक भुमिपूजन सोहळा पार पाडला. नेहमीच्या भव्य दिव्य पद्धतीने हा सोहळा पार पाडला गेला.

समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभे करण्याचे स्वप्न त्यांनी दाखवले होते. त्यापूर्वी झालेल्या निवडणूकांमध्ये शिवस्मारक उभारणी हा भाजपाचा सगळ्यात मोठा मुद्दा होता. आता पाच वर्षे झाली, अजूनपर्यंत त्या शिवस्मारकाची एक वीटही उभारलेली नाही. आता कोणी त्या विषयाकडे लक्षही देत नाही अशी स्थिती आहे.

परंतू शिवस्मारक उभारण्याची स्वप्न महाराष्ट्रातील जनतेला दाखविण्याची ही पहिली वेळ नाही. १९९६ सालच्या शिवसेना – भाजप सरकारनेही असेच स्वप्न दाखवले होते. त्यावेळी या स्मारकासाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून फक्त या स्मारकासाठी होणाऱ्या खर्चाचे आकडेच फक्त वाढत आहेत. प्रत्यक्ष शिवस्मारक कधी होईल हे न सांगता येण्यासारखे आहे. ७० कोटीवरून सुरू झालेला या खर्चाचा आकडा आता २९०० कोटीवर पोचला आहे. या दरम्यान दोन वेळेस स्मारकाची जागाही बदलण्यात आली.

२०१४ ची निवडणूक भाजपाने शिवछत्रपतींचे नाव घेऊन त्यांचे जगातील सर्वाधिक उंच असे स्मारक उभारणार असे सांगून लढवली. त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे भव्य दिव्य भूमिपूजन झाले. पुन्हा सगळे शांत झाले.
अधूनमधून या पुतळ्याच्या उंचीवरून वाद तयार केले जातात. वर्ष दोन वर्षानी वेगवेगळे मुख्यमंत्री होडीत बसून सध्याच्या स्मारकाच्या ठिकाणी जातात. परत आले की फक्त स्मारकासाठी येणाऱ्या खर्चाची किंमत वाढते. प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने काहीच होत नाही.

यातून कोणताही राजकीय पक्ष बाजूला काढता येण्यासारखा नाही. गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातला प्रत्येक पक्ष आळीपाळीने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर बसला. काहीजण २-३ वेळा बसले. पण एकालाही हा मुद्दा तडीस नेता आला नाही.
ज्या महापुरुषाने उण्यापुऱ्या ५० वर्षाच्या आयुष्यात अनेक दुर्ग अक्षरश: घडवले, सजवले आणि त्याच्या वंशजांनी ते लढवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे महाराष्ट्रातील राजकारणी लोकांसाठी गेली २५ वर्षं एक राखीव कुरण बनलंय यासारखी शरमेची बाब नाही.

लोकांच्या भावनेशी खेळायला छत्रपतींचा उपयोग वर्षानुवर्षं राजकारणी करत असताना आपल्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही हे तर अजूनच खेदजनक आहे.
एकीकडे महाराजांचे अनेक किल्ले, त्यावरील भग्न दरवाजे, तटबंद्या, बुरुज अखेरचे श्वास घेत आहेत. त्या स्मारकांचं जतन व्हावं असं वाटणारी राजकारणी लोकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा नाहीत.
त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करुन, कोणीही मागणी केलेली नसताना, गेली २५ वर्षं समुद्रातलं शिवस्मारक बांधण्यासाठी, दर दोन-पाच वर्षांनी वेगवेगळे मुख्यमंत्री लाईफ जॅकेट घालून, बोटीतून खडकाची पाहणी करायला जातात आणि स्मारकाची किंमत वाढवून परत येतात हे जेव्हा आपण समजून उमजून घेऊ तोच सुदिन..

बाकी महाराजांचा इतिहास, त्यांचं कर्तृत्व, त्यांची निती आणि त्यांची ध्येयं ही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी अभ्यासावी हे सांगणं सुद्धा फोल ठरेल ह्यात तीळमात्र शंका नाही.

Next Post

शिवरेतील बावीस वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group