भोर : महान्यूज लाईव्ह
माणिक पवार
चारचाकी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करणारा भोर तालुक्यातील शिवरे गावातील बावीस वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईक चिंतातुर झाले आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे राजगड पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.
ठाणे अंमलदार प्रमिला निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ संपत खुडे ( रा. शिवरे ता. भोर ) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ हा दि. 17 डिसेंबर रोजी दुपारी पुण्यात असल्याचे त्याने मोबाईल वरून आपल्या वडिलांना सांगितले होते. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत असून अद्यापपर्यंत घरी आला नसल्याने सौरभ बेपत्ता झाले असल्याने त्याचे वडील संपत विष्णू खुडे यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
बेपत्ता झालेल्या वर्णन सौरभ संपत खुडे वय 22 वर्षे, सोबत विवो कंपनीचा मोबाइल आहे. रंगाने निमगोरा, चेहरा गोल, उंची 5 फूट 3 इंच, अंगाने मजबूत, केस काळे राखलेले, नेसनीस पांढऱ्या रंगाचा फुल बायाचा शर्ट पायात पॅरागॉनची चप्पल, हिंदी मराठी भाषा बोलता येत असून अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास राजगड पोलिस ठाणे 02113 – 272233 अथवा सहायक उपनिरीक्षक सतीश चव्हाण व पोलिस हवालदार सागर गायकवाड यांच्या 96236937280 व 9767777100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राजगड पोलिसांनी केले आहे.











