• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

tdadmin by tdadmin
December 17, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

आप्पासाहेब खेडकर : महान्युज लाईव्ह

खाजगी भांडवलदार एकत्र आले की, शेतकऱ्यांची गळचेपी होते, व्यापारी राजा झाला की, जनता भिकारी होते या म्हणी काही उगीच तयार झालेल्या नाहीत. म्हणूनच तर खाजगी साखर कारखान्यांच्या गळचेपी विरोधात महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीची चळवळ सुरू झाली, आता पुन्हा एकदा भांडवलशाहीचा वरवंटा शेतकऱ्यांच्या शेतावर फिरू लागला आहे..

विशेषतः दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना तर याचा चांगलाच अंदाज येऊ लागला आहे, कारण. दौंड तालुक्यातील चारही खाजगी साखर कारखान्यांनी सन २०२५-२६ साठी गाळपास आलेल्या ऊसाला सगळ्यांनीच एकसारखी पहीली उचल ३१०० प्रतिटनाप्रमाणे जाहीर केला आहे. विशेष म्हणजे तालुक्याशेजारील कारखान्यांपेक्षा सरासरी २०० रुपयांनी पहीला हप्ता या कारखान्यांनी कमी दिला असल्याने तालुक्यातील ऊस ऊत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.

यावर्षी तालुक्यातील दौंड शुगर (आलेगाव), भीमा शुगर (पाटस), श्रीनाथ म्हस्कोबा (पाटेठाण), ग्रीन पाॅवर (अनुराज यवत) या चारही साखर कारखाने वेगाने सुरु आहेत. आतील दौंड शुगर, भीमा शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा हे कारखाने उसाबरोबर आसवनी, सहवीजनिर्मिती या उपपदार्थाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. तर नुकताच बंद पडलेला अनुराज कारखाना ओंकार ग्रुपने सुरु केला आहे.

दरम्यान  तालुक्याच्या काही अंतरावर असणाय्रा सोमेश्वर व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी चालुवर्षीच्या गाळपाला येणाऱ्या उसाला पहीली ऊचल ३३०० जाहीर केली आहे. तसेच अडचणीत असलेल्या छत्रपती व निराभीमा साखर कारखान्यांनी ३१०० ऊचल जाहीर केली. तसेच शेजारील शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्यांने ३१५० रूपये, तर गौरी शुगर (हिरडगाव ) ३२०० अंतिम दर जाहीर केला आहे.

यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक  शेतकऱ्यांचे चारही कारखान्यांच्या पहील्या उचलीकडे लक्ष लागले होते. दरम्यान उशिरा का होईना, झोपेचे सोंग घेतलेल्या कारखान्यांच्या प्रशासनाला जाग आली. दौंङ शुगर, भीमा शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, ग्रीन पावर या कारखान्यांनी ३१०० पहीला हप्ता जाहीर करुन पंधरवाङा जमा केला आहे.

दरम्यान चारही साखर कारखान्यांनी ऊसाला स्पर्धात्मक दर देणे गरजेचे होते. परंतु सर्वांनी बहुतेक परस्पर चर्चा करुन एकच पहीली ऊचल दिल्याने शेतकऱ्यांनी  संताप व्यक्त केला आहे. वास्तविक चारही कारखान्यांच्या पाठीमागे अनेक बडे प्रस्थ असून उद्योग व्यावसायात त्यांची आघाडी आहे. यामुळे उसाला चांगला बाजार मिळेल अशी शेतकऱ्यांची मोठी आशा होती. परंतु सध्या त्यांचा भ्रमनिरास झालेला दिसत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी संघटीत होऊन लढा उभारणे गरजेचे आहे. परंतु तालुक्यातील शेतकरी गटातटात विभागले गेले असल्याने कारखानदारांचे ऊखळ पांढरे होत असल्याची वस्तुतिथी आहे. तालुक्यातील कारखान्यांना ऊस वाहतुकीचे अंतर कमी असुन दरवर्षी गाळपही चांगले होत आहे. यामुळे इतर कारखान्यांप्रमाणे बाजार मिळणार केव्हा ? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

Next Post
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group