बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार संग्राम थोपटे आमदार संजय जगताप रेवणनाथ दारवटकर माऊली दाभाडे हे सहा जण बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित मतदार संघातील सात जागी लढत होणार असून ब,क,ड, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व महिला प्रवर्गातील उमेदवारांच्या लढती होणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये बारामतीतून अजित अनंतराव पवार, आंबेगाव मधून दिलीप दत्तात्रय वळसे, भोर तालुक्यातून संग्राम आनंदराव थोपटे, पुरंदर मधून संजय चंद्रकांत जगताप, वेल्हे मतदारसंघातून रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर, मावळ मतदार संघातून ज्ञानोबा सावळेराम दाभाडे हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
खेडमधून दिलीप दत्तात्रय मोहिते, शिरूर मधून आमदार अशोक रावसाहेब पवार, दौंड मधून बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश किसनराव थोरात, जुन्नर मधून संजय शिवाजीराव काळे, मुळशी मतदारसंघातून सुनील काशिनाथ चांदेरे, इंदापूर मतदार संघातून रणजीत बाबुराव निंबाळकर यांची नावे जाहीर केली असून हवेली मतदार संघामध्ये कोणाचीही नावे जाहीर न करता मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वर्ग मतदारसंघातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे; क वर्ग मतदारसंघातून हवेली तालुक्यातून सुरेश मारुती घुले, ड वर्ग मतदारसंघातून पुरंदर मधून दिगंबर गणपत दुर्गाडे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून हवेलीचे प्रवीण बाजीराव शिंदे, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून बारामतीतून संभाजी नारायण होळकर, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून बारामतीतून दत्तात्रय महादेव येळे, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून जुन्नर मधून पूजा संभाजी बुट्टेपाटील, वेल्हे मतदारसंघातून निर्मला कृष्णा जागडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत लक्षवेधी राहणार आहे या ठिकाणी विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना सणसरचे सरपंच व छत्रपती चे संचालक रणजीत बाबुराव निंबाळकर यांच्याशी होणार आहे. रणजित निंबाळकर यांच्यासाठी राष्ट्रवादीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर आप्पासाहेब जगदाळे हे विद्यमान संचालक असून त्यांचा तगडा संपर्क असल्याने ही लढत लक्षवेधी होणार आहे.