शिरूर : महान्यूज लाईव्ह
गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून श्री गणेशा च्या मूर्तीवर रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गणेशोत्सव अर्थात सर्वांचा लाडका सण जवळ आला आहे. काही ठिकाणी पूर्व तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यात घोलपवाडी येथील महेश कुंभार हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मूर्तींचे तयार करून विक्री करण्याचे काम करतात.
गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्ती बनविण्याचे कामाची लगबग सुरू असून याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर प्रथमच या वर्षी मोठी तयारी केली आहे. यासाठी कच्चा माल बाहेरगावाहून आणून घरच्या घरी मूर्ती बनविण्याचे काम केले आहे.
या आठवड्यात शेवटचा रंग देण्याचे काम होणार असून सुमारे ४५० मूर्ती या वर्षी प्रथमच उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन मुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. तसेच याही वर्षी अडचणींचा सामना करावा लागला आहे, मात्र सध्या शासनाने बहुतांश निर्बंध कमी केल्याने चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. शिरूर तालुक्यासह तळेगांव ढमढेरे परिसरात या मूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध राहतील असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.











