शिरूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
शिरूर तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर जुलै महिन्यात काही ठिकाणी साधारण पाऊस झाला. या पावसावर बाजरी, मूग, भुईमूग, कडधान्ये आदी पिके चांगली जोमदार आली. सध्या मुग, भुईमूग, पिके काढणीच्या काढणीच्या स्थितीत असून अनेक ठिकाणी बाजरी फुलोऱ्यात आलेली आहे.
जुलै महिन्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती. मात्र पाऊस जेमतेम तर काही ठिकाणी किरकोळ झाला. सध्या कडक ऊन पडत असून श्रावण सरी देखील होत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या बाजरी, तसेच अन्य पिकांना पाण्याची गरज असून अनेक ठिकाणी महावितरण कडून शेतकऱ्यांची रोहित्रे तसेच वीज बंद केली जात आहेत. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी आहेत.