राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी बदली झाली आहे. त्यांची तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनलाच बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पदभार स्विकरला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची अवघ्या नऊ महिन्यातच अचानक झालेल्या बदलीने शहरातील नागरिकांना सुखद धक्का बसला आहे.
जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी जिल्हयातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या बदलीचा आदेश काढला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी बदली झालेल्या ठिकाणी पदभार स्विकारून कामकाजाला सुरवात केली आहे.
दौंड तालुक्यातील दौंड आणि यवत पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षकांची बदली झाली असून थोडा बदल करण्यात आला आहे. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची अवघ्या नऊ महिन्याच्या कालवधीतच त्यांच्याकडून दौंडचा पदभार काढून त्यांना यवत पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे.
यवत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड पोलीस स्टेशनला अवघ्या नऊ महिन्यातच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंद्यांना लगाम घातला होता.
अनेकांच्या गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा खायला लावली. तर शहरातील टोळ्या, गुन्हेगारांवर ही जरब बसवली होती. त्यांना आता यवत पोलीस स्टेशनची जबाबदारी दिल्याने यवत पोलीस स्टेशनला ही त्याच प्रकारचे कामकाज करतील अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
दौंड पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे ही दौंड तालुक्यासाठी नवीन नाहीत. विनोद घुगे यांनी यवत पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून यवत पोलीस स्टेशनला कामकाज केले आहे.
त्यांनी ही अवघ्या काही दिवसातच यवत पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदा धंदे बंद करून रोडरोमिओ, रॅाबरी यातील गुन्हेगारांना जेरबंद केले होते. त्याचे कामकाज हे दौंड तालुक्यातील ग्रामस्थांनी पाहिले आहे. या दोन्ही अधिका-यांनी पदभार स्विकारताच आपल्या हद्दीतील अवैदय धंदे, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
यामुळे या दोन्ही पोलीस स्टेशनाला पदभार स्विकारलेले अधिकारी हे दौंड तालुक्यासाठी नवीन नाहीत. तालक्यातील आमदार कुल आणि माजी आमदार थोरात गट याविषयी चांगलीच माहिती आहे. तसेच शहरातील आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची कल्पना आहे. राजकीय हस्तक्षेप कमी झाल्यास हे दोन्ही अधिकारी अंत्यत चांगल्या प्रकारे तालुक्यातील अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी यांना आळा बसवून कायदा सुव्यवस्था प्रश्न आणि तालुक्यात शांतता राखतील अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.











