संदीप मापारी पाटील, लोणार, बुलढाणा
लोणार स्थानिक माजी नगराध्यक्ष रंजना राजेश मापारी व जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी यांची कन्या कु अंकिता मापारी हिची फूड सायन्स पदव्युत्तर( एम एस )शिक्षणासाठी शिकागो अमेरिका येथे निवड झाली. या निमित्त भगवान बाबा महाविद्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भूषण देशमुख यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोणार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शांतीलाल गुगलिया तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराव मापारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाशराव मापारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, नगरपरिषद गटनेते भूषण मापारी, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी, तहसीलदार सैफान नदाफ मान्यवर उपस्थित होते.
लोणार सारख्या शहरातून उच्च शिक्षणासाठी जाणारी कु. अंकिता ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. यावेळी यांचा कार्यक्रमामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, पत्रकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी अंकिताचा सत्कार केला.
यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष बादशहा खान, गणेशराव मापारी, प्राचार्य डॉ शामराव बडे, पाणीपुरवठा सभापती आबेद खान, नगरसेवक शेख रऊफ शेख महेबूब रमजान परसूवाले, प्रा सुदाम कांबळे, नगरपरिषद अभियंता अजय हाडोळे, विजय सानप, छगन कंकाळ, सतीश राठोड, पंढरी चाटे, ज्ञानेश्वर चिभडे आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजानन खरात यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ राजेंद्र बोरसे यांनी केले ..











