माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २१ _ रक्षाबंधननिमित्त नसरापूर येथील तनिष्का महिला भगिनींनी कोरोणा काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजगड पोलिस, आरोग्य, महसुल, स्वच्छता कर्मचारी व स्थानिक पत्रकार यांचा कोविडयोध्दा सन्मान करून अनोखा रक्षाबंधन साजरा करण्यात आला आहे..
तनिष्का महिला मंडळाच्या वतीने आज नसरापूर परिसरात कोरोना कार्यकालात उत्कृष्ठ काम करणारया सर्वच विभागातील अधिकारी ते सर्वसामान्य कर्मचारी अशा १५० जणांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विठ्ठल मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास राजगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, जेष्ठ महिला लिलावती जंगम,सरपंच रोहीणी शेटे, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, भोर पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव भुतकर, महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम, तनिष्का गटप्रमुख वैशाली झोरे, माजी सरपंच उज्वला जंगम, ज्योती चव्हाण, नटराज मंडळाचे संजु घाटे, गौरव जंगम, दादा जगताप तसेच तनिष्का गटाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
नसरापूर येथील तनिष्काच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जयदीप कापशीकर व सर्व आरोग्य कर्मचारी,पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे व सर्व पोलिस कर्मचारी, ग्रामसेवक विजय कुलकर्णी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली व सर्व महसुल कर्मचारी व सर्व पत्रकार व कोरोना कार्यकाळात सर्व समान्यांसाठी अन्नदानाचे काम करणारया नटराज युवक मंडळ यांचा कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले की, या सन्मानामुळे सर्व कोविड कर्मचारयांचा उत्साह वाढणार आहे नसरापूर महिला मंडळाने पाठिवर दिलेली ही थाप निश्चित प्रशंसनीय आहे असे मत व्यक्त करत तनिष्का महिला मंडळाचे आभार मानले.
श्रीनिवास कंडेपल्ली यांनी बोलताना कोविड कार्यकाळात खुपच तणावात काम करावे लागले परंतु जेव्हा समाजातील नागरीक असे पाठिशी उभे राहतात तेव्हा पुन्हा बळ मिळते असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात तनिष्काच्या सदस्या वर्षा खुटवड यांनी स्वागतगीत गायले. स्वामी समर्थ भजनी मंडळाने कोरोनावर गायन सादर केले. सर्व मान्यवरांना तनिष्का महिलांनी यावेळी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. प्रास्तविक गटप्रमुख वैशाली झोरे यांनी केले. सुत्रसंचालन पत्रकार माणिक पवार यांनी केले, तर आभार मंगल खुटवड यांनी मानले.