मुंबई : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या दबंग नेत्या आशा बुचके यांनी १५ वर्षांची आपली शिवसेनेशी असलेली निष्ठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या भाजप पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपने त्यांना येणारी २०२४ ची विधानसभा लढविण्याचेच जणू आदेश दिले.
आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुचके यांनी शिवसेनेकडून सलग चार वेळा जिल्हा परीषदेमध्ये प्रतिनिधीत्व केले. मात्र माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
दरम्यान शिवसेनेत आशा बुचके यांना न्याय मिळाला नाही, मात्र त्या भाजपकडून सन २०२४ मधील जुन्नरच्या आमदार असतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगून बुचके यांना थेट निवडणूकीची तयारी करण्याची सूचना केली.