नगर : महान्यूज लाईव्ह
अनेकदा बँकेतून पैसे घेऊन निघालेल्या लोकांवर चोरटे नजर ठेवतात आणि टायर पंक्चर झाला आहे, ऑईल गळते आहे किंवा तुमचे खाली काहीतरी पडले आहे, पाकीट पडले आहे अशी काही कारणे सांगून संबंधितांचे लक्ष विचलित केले जाते आणि त्यातून लाखोंचा रकमा पळवल्या जातात.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह, शहरी भागाला अशा प्रकारची गुन्हेगारी पद्धत नवीन नाही, पण आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बारडगाव येथील कर्मचाऱ्याने जो सतर्कपणा दाखवला, त्यामुळे बँकेची पन्नास लाखांची रोकड वाचली. या प्रसंगावधानी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कर्जत पोलिसांनी देखील कौतुकाची थाप टाकली.
सुरज सुखदेव सोळसे हे युनियन बँकेच्या कर्जत तालुक्यातील बारडगाव शाखेत विशेष सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांनी आज सकाळी बँकेच्या कर्जत शाखेतून 50 लाख रुपये विड्रॉल केले आणि ती रोकड गाडीत ठेवून गाडी चालू केली. तेव्हा एका अनोळखी लहान मुलाने तुमच्या गाडीतून ऑइल गळती होत असल्याचे सांगितले.
फक्त एकच क्षण परंतु अचानक सोळसे यांच्या लक्षात आले की आपल्या गाडीतून ओईल सांगूच शकत नाही पक्का विश्वास असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सतर्कपणा दाखवत गाडीतून रोकड काढून पुन्हा बँकेत जमा केली आणि लगेच पोलिसांशी संपर्क साधला.
कारण तेथूनही ते रोकड घेऊन गेले असते, तर त्यांच्या पाळतीवर चोरटे राहिले असते. त्यामुळे सोळसे यांनी दाखविलेली हा प्रसंगावधानी सतर्कता पोलिसांच्या दृष्टीने देखील कौतुकाची बाब बनली आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सोळसे यांचा सत्कार केला.