बारामती : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच आसाम आणि मिझोराम मधील संघर्षामध्ये जखमी झालेले चे सुपुत्र बारामती सुपुत्र आसाम पोलीस दलाचे आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांना आसामचे मुख्यमंत्री यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक जाहीर केले
आसामच्या बराक खोऱ्यातील कच्चर, करीमगंज आणि हेलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मनात या तीन जिल्ह्यांना लागून 164 किलोमीटरची सीमा आहे.
या सीमेच्या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये गोळीबार झाला आणि यामध्ये आसाम पोलिसांनी मिझोराम मधील कोलासिब पोलीस चौकीचा ताबा घेतल्याचे कारण देत मिझोराम कडून झालेल्या गोळीबारात आसामचे पाच पोलीस शहीद झाले होते.
त्यामध्ये मराठी आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
त्यानंतर काल स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्कृष्ट अधिकाऱ्याचा किताब दिला. याची माहिती वैभव यांच्या बहीण आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून दिली आहे.