पुणे : महान्यूज लाईव्ह
औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील दोन वाघांची जोडी पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाकडे देण्यात आली असून या वाघांच्या बदल्यात पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाने औरंगाबादच्या महापालिकेला दोन नीलगायी भेट दिलेल्या आहेत.
औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात वाघांची संख्या 14 झाली होती क्षमतेपेक्षा अधिक झालेल्या या वाघांची इतर ठिकाणी रवानगी करण्याची गरज होती. त्यामुळे ही जोडी पुणे प्राणिसंग्रहालयात देण्याचा निर्णय नुकताच झाला होता.
त्या बदल्यात पुण्यातील प्राणी संग्रहालयातून दोन नीलगाय औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात देण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानुसार पुण्यातील नीलगाय घेऊन प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव त्यांचे पथक औरंगाबाद मध्ये दाखल झाले, तर औरंगाबाद येथून दोन पिवळ्या वाघाची जोडी घेऊन हेच पथक पुण्याला रवाना झाले.