पुणे : महान्यूज लाईव्ह
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथील केले जात असताना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र अद्याप हे निर्बंध सुरूच होते. मात्र आता जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षाही खाली आल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निर्बंध शिथील केले आहेत. हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे निर्बंध शिथील केले असून सोमवारपासून हे निर्बंध शिथील केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आङे. या नव्या निर्बंधांनुसार सर्व हॉटेल, बार ५० टक्के क्षमतेसह रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत ऑर्डर स्विकारता येईल. जीम, सलून, स्पा हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील, मात्र त्यांची क्षमता ५० टक्के एवढीच राहील. अर्थात मॉलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांकरीता कोरोना लसीचे दोन डोसची अट ठेवली असून दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये जाण्याची परवानगी दिलेली आहे.
विवाह सोहळा, आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेसह आय़ोजित करण्यासही परवानगी दिलेली आहे. खुल्या जागी कमाल २०० लोकांसह तर बंदिस्त हॉलमध्ये १०० लोकांच्या मर्यादेत ही परवानही राहणार आहे,