पूरग्रस्त बांधवांसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी मदत रवाना…
अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता अशोक पवार यांच्या रावलक्ष्मी फाउंडेशन मार्फत एक हात मदतीचा या व संकल्पनेतून केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
चिपळूण, महाड, रायगड या पुरग्रस्त भागातील कुटुंबीयांना 49 संसार उपयोगी वस्तुंचे एकुण 10 हजार पेक्षा जास्त किट तयार करण्यात आले आहेत. मदत व्यवस्थितरित्या तेथील कुटुंबियांना पोहोच होणे गरजेचे या उद्देशाने 27 गाड्यांच्या ताफ्यासह शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार स्वतः कार्यकर्त्यांसमवेत रवाना झाले आहेत.
त्यांच्या उपस्थितीमध्ये पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य संसार ऊपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात येणार आहे. ही नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून केली गेलेली सर्वात मोठी मदत असल्याचा दावा केला जात आहे.