संदीप मापारी पाटील बुलढाणा
लोणार शहरातील कमळजा माता पेट्रोल पंपाजवळील रहिवासी असलेले डॉ. सुरेश फकीरराव सानप हे आज पहाटे साडेपाच वाजता च्या दरम्यान मॉर्निंग वॉक साठी निघाले असता, लोणी रस्त्यावर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
डॉक्टर सुरेश सानप यांचा आज नेमका वाढदिवस होता. आणि वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना मृत्यूने कवटाळले. या घटनेने शहरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांना धडक देऊन वाहन निघून गेले त्यानंतर नागरिकांनी त्यांना जालना येथे उपचारासाठी चालवले होते मात्र दुर्दैवाने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना धडक दिलेले वाहन हे पुण्याकडील वाहन असल्याचे दिसून आले. या वाहनचालकाला ताब्यात घेण्यासाठी लोणार पोलिस आर्णी येथील पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश काळे, राम गीते, कृष्णा निकम, जगदीश सानप यांचे पथक या वाहनास शोधात निघाले आहेत. या घटनेचा पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.