महिलांसाठी बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी :
बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील रागिणी फाऊंडेशनच्या वतीने नागपंचमी निमित्त महिलांसाठी खास ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
यावर्षी महिलांनी ‘माणुसकीचा वसा’ या विषयावर आधारित कमीत कमी ती जास्त दोन मिनिटांचा उखाणा घेणे बंधनकारक आहे. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ क्रमांक तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सहभागी स्पर्धकांची विषयाची मांडणी, सादरीकरण, समयसूचकता, एकूण प्रभाव, आणि युट्युब वरील लाईक, कमेंट्स यावर आधारित गुणांकन केले जाणार आहे. कोरोना काळात महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, पारंपरिकता आणि संस्कृती सोबत वास्तव परिस्थितीवर भाष्य करता यावे, कोरोना काळातही महिलांना सणांचा आनंद घेता यावा याकरिता ही उखाणा स्पर्धा आयोजित केली आहे.
सर्व सर्व महिलांसाठी ही स्पर्धा खुली असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ९६०४३९८६४५ या मोबाईल क्रमांकावर व्हिडिओ पाठवावा.











