दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोंढावळे (देवरुखवाडी) येथे भूस्खलन झालेल्या ठिकाणी आसरे ग्रामस्थांनी व मुंबईस्थित गावातील लोकांनी येऊन कोंढावळेत ग्रामस्थांची समक्ष भेट घेतली. झालेल्या दुर्घटनेबाबत चर्चा केली. व या संकट काळात आम्ही आपल्या पाठीशी आहोत हा विश्वास निर्माण केला.
याच भावनेतून गरजेचे साहित्य (उदा. ब्लॅंकेटस वगैरे) वाटप केले व आर्थिक मदत म्हणून 50 हजारांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक सुरज कासुर्डे ( इच्छापूर्ती बिल्डर अँड डेव्हलपर्स), नवजीवन विकास मंडळाचे कार्याध्यक्ष आत्माराम श्रीपती सणस, आसरे गावचे माजी सरपंच बबन सणस , सुनील सणस, सचिन शिंदे, पोलीस पाटील गणेश जरंडे, कालिदास येवले, सर्जेराव सणस, कालिदास सणस, विजय सणस, मानसिंग सणस, रमेश जेधे उपस्थित होते.
या सामाजिक कार्याला मदतीचा हात देणारे राजेंद्र पवार, संजय गोंजारे, प्रकाश गोंजारे, रोहिदास गोंजारे, पप्पू कासुर्डे, संतोष सणस, संतोष लोकरे या सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल कोंढावळे ग्रामस्थांनी आसरे ग्रामस्थांचे आभार मानले .











