इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोविड योद्धा हा पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखीनच वाढली आहे, माझ्या बावडा गावात मिळालेला हा सन्मान मला व पुढील सामाजिक कार्य करण्यास प्रोत्साहित करीत राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केले.
विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था, बावडा यांच्या वतीने आज पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब कांबळे, उपाध्यक्ष भीमराव कांबळे, सचिव संतोष सावंत, खजिनदार गौतम जगताप व इतर मान्यवरांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील यांना हा कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर अंकिता पाटील संस्थेचे आभार मानताना बोलत होत्या
विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी पुरस्कार दिला, याबद्दल संस्थेचे आभार मानत अंकिता पाटील पुढे म्हणाल्या, या पुरस्काराने मला आणखी सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. हा पुरस्कार म्हणजे माझा व माझ्या सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. कोविड योद्धा हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील असे ही त्यांनी सांगितले.











