बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तालुका विधी समिती व तालुका वकील संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व व दाखल प्रकरणांपैकी तब्बल ७८३ प्रकरणे तडजोडीने मिटले, निकाली काढण्यात आले. तर या प्रकरणांमधून तब्बल २ कोटी ११ लाख रुपयांची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांमधील ७६ लाखांची वसुली झाली.
या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व ४ हजार १४ प्रकरणे तर दाखल असलेले १९०६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दाखलपूर्व प्रकरणांपैकी संस्थांशी संबंधित व वसुलीशी संबंधित प्रकरणांपैकी २ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांच्या वसुलीवर तडजोडीची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या अदालतीसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जे.पी. दरेकर यांच्यासह तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत सोकटे, सचिव अॅड. अजित बनसोडे, सहसचिव अॅड. गणेश शेलार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.











