किशोर भोईटे, महान्युज लाईव्ह
सणसर येथील कृषिराज उर्फ नितीन निवृत्ती निंबाळकर यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा पालक मंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भाऊ घोटकुले यांनी दिले. यावेळी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समिती चे सदस्य सचिन सपकळ ,श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सणसर चे सरपंच ॲड रणजितसिंह निंबाळकर, निमगाव केतकी चे सरपंच प्रवीण भैया डोंगरे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सागर भोईटे ,राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका सरचिटणीस योगेश माने, सामाजिक कार्यकर्ते अक्षय भोसले, नितीन भोईटे , गोपी भोईटे, रोहीत पाटील, जगदिश कदम यांच्यासह कार्यकर्ते निवडीवेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन निंबाळकर यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांना येणाऱ्या समस्या सोडविणे तसेच सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याकामी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच गावागावांमध्ये वृक्षारोपणासाठी युवकांना प्रोत्साहन देऊन वृक्ष चळवळ उभी करण्यात येईल असे सांगितले.











