किशोर भोईटे ,महान्यूज लाईव्ह
सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकणात मुसळधार पावसाने सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून सणसर ,तालुका इंदापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट आज सरपंच अॅड रणजित निंबाळकर व उपसरपंच राजश्री गुप्ते व सर्व सदस्य यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.
तेथील नागरीकांचे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे घरातील सर्व किराणा साहित्य, कपडे, भांडी, यासह संपर्ण संसार पाण्यामध्ये भिजून खराब झाले आहे. तेथील नागरिकांना ‘ एक हात मदतीचा ‘ म्हणून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने दरे ता. महाबळेश्वर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट रवाना करण्यात आले.
यावेळी सणसर ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड रणजीत निंबाळकर, उपसरपंच राजश्री गुप्ते ,माजी सरपंच विजय निंबाळकर, सदस्य अभयसिंह निंबाळकर, यशवंत नरुटे, युवा सेना तालुकाध्यक्ष सोमनाथ गुप्ते, सदस्य चंद्रकांत सावंत, अनील शेंडगे, शैलेश काळे, जयराम गायकवाड, दीपक चव्हाण, धनंजय दुबळे ,राजेंद्र कदम, सागर भाग्यवंत, माजी उपसरपंच यजुर्वेंद्रसिंह निंबाळकर, अशोक काळे, सागर भोईटे ,श्रीनिवास कदम, मुरलीधर चव्हाण, सणसर सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, महेंद्र खवळे, विकास छत्रिय, स्वामी धोत्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.











