बारामती : महान्यूज लाईव्ह
नुकताच झालेल्या ओबीसी आरक्षण मेळाव्याचे निमित्ताने बारामतीमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आयोजित होता. यावेळी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान बारामती शहर सचिव पदी संतोष जाधव यांची निवड करण्यात आली.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जेष्ठ नेते रंजन तावरे, अविनाश मोटे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऍड. माने, युवा शहराध्यक्ष मलगुंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यश या आयोजित कार्यक्रमात संतोष जाधव यांना बारामती शहर सचिव पदाचे पत्र देण्यात आले तर बारामती शहर सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी प्रमोद डिंबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीनंतर पक्ष वाढीसाठी काम करणार असून, सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लावणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.











