इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या काळात सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा तेजपृथ्वी ग्रुपने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला. हा सन्मान त्यांना स्फूर्ती देईल असे प्रतिपादन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.
कोरोना च्या काळात कोरोना रुग्णांना आधार देत व समाजासाठी योगदान देणा-या सामाजिक कार्यकर्त्यांचा तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने खोरोची येथे कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून परीट बोलत होते. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कोरोना आटोक्यात येण्यासाठी समाजातील योगदान देणारे आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका, शिक्षक, डॉक्टर, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांचा सन्मान सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आला.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल विलास वाघमोडे यांना समाजसेवक म्हणून पुरस्कार प्रदान केला. तसेच तालुका सरपंच सघंटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संजय रूपनवर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी तेजपृथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात यांनी प्रास्ताविक केले. विलास वाघमोडे, महेंद्र रेडके, डॉ शशिकांत तरंगे, अप्पा माने, तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पाडुरंग मारकड, गणेश शिंगाडे, हनुमंत यमगर, प्रसाद पाध्ये, रूपेश वाघमोडे, सोमनाथ वाघमोडे, बापु कचरे, महेश शिंदे, दुर्योधन पाटील, पुजा पाध्ये, संजय चव्हाण, राजु भाळे, विनोद सावंत, राहूल क्षीरसागर उपस्थित होते. आभार अर्चना गोरड यांनी मानले.











